Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- विद्युत जनित्र यामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे?
A) रासायनिक ते विद्युत
B) यांत्रिक ते विद्युत
C) विद्युत ते यांत्रिक
D) प्रकाश ते विद्युत - DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
A) रेबीज
B) चिकनगुनिया
C) क्षय
D) पोलिओ - चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होतो?
A) विषाणू
B) जीवाणू
C) कवक
D) प्रोटोझुआ - स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे?
A) कॅल्शियम क्लोराईड
B) सोडियम बायकार्बोनेट
C) कॅल्शियम कार्बोनेट
D) सोडियम क्लोराईड - अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) धुळे
B) पालघर
C) रायगड
D) सातारा - बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) नाशिक
B) वाशिम
C) बीड
D) बुलढाणा - येडशी-रामलिंगे घाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) कोल्हापूर
B) रायगड
C) अकोला
D) धाराशिव - संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र.के.अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले?
A) मौज
B) नाव काळ
C) दै. मराठा
D) प्रभात - छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?
A) नायिकाभेद
B) सातसतक
C) बुधभुषण
D) यापैकी सर्वच - कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही?
A) CRPF
B) BSF
C) ITBP
D) CID - खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते?
A) भगतसिंग कोश्यारी
B) डॉ. पी.सी. अलेक्झांडर
C) गणेशी लाल
D) सी. विद्यासागर राव - अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते?
A) जे.एम. केन्स
B) पॉल कुगमन
C) अमर्त्य सेन
D) ॲडम स्मिथ
उत्तरे –
- यांत्रिक ते विद्युत
- क्षय
- विषाणू
- सोडियम क्लोराईड
- पालघर
- बीड
- धाराशिव
- दै. मराठा
- यापैकी सर्वच
- CID
- गणेशी लाल
- ॲडम स्मिथ
