General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 09

Last Updated on November 26, 2025 by Topcop Academy

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे

  1. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे?
    A) फसवणूक
    B) सायबर गुन्हे
    C) शरीराविरुद्धचे गुन्हे
    D) यापैकी नाही

  2. पंखा (फॅन) ऊर्जेचे कोणते रुपांतर दर्शवतो?
    A) विद्युत-यांत्रिक
    B) यांत्रिक-विद्युत
    C) यांत्रिक-रासायनिक
    D) यापैकी नाही

  3. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपती असतो आणि संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते हा नियम कोणता?
    A) न्युटन चा गतीचा पहिला नि.
    B) न्युटन चा गतीचा दुसरा नि.
    C) न्युटन चा गतीचा तिसरा नि.
    D) ऊर्जा अक्षय्यतेचा नि.

  4. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो?
    A) 144 मीटर/सेकंद
    B) 1 किमी/सेकंद
    C) 244 मीटर/सेकंद
    D) 344 मीटर/सेकंद

  5. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
    A) सिंधुदुर्ग
    B) कोल्हापूर
    C) रायगड
    D) सातारा

  6. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे?
    A) उमरेड
    B) रामटेक
    C) वर्धा
    D) अमरावती

  7. महात्मा ज्योतीबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट/महाज्योती चे मुख्यालय कोठे आहे?
    A) गडचिरोली
    B) मुंबई
    C) पुणे
    D) नागपूर

  8. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही?
    A) बुद्ध व त्याचा धम्म
    B) द प्रॉब्लेम ऑफ रुपी
    C) अॅनहिलेशन ऑफ कास्ट
    D) यापैकी नाही

  9. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते?
    A) दर्पण
    B) ज्ञानप्रकाश
    C) शतपत्रे
    D) दिग्दर्शन

  10. केंद्रीय मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते?
    A) विधानसभा
    B) लोकसभा
    C) राज्यपाल
    D) विधानपरिषद

  11. भारताचे व्यक्ती म्हणून दुसरे राष्ट्रपती कोण होते?
    A) राजेंद्रप्रसाद
    B) डॉ.एस.राधाकृष्णन
    C) पंडित नेहरु
    D) सरदार वल्लभभाई पटेल

  12. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भाव येणारे मूल्य म्हणजे?
    A) NNP (Net National Product)
    B) NDP (Net Domestic Product)
    C) GDP (Gross Domestic Product)
    D) GNP (Gross National Product)

उत्तरे –

  1. सायबर गुन्हे
  2. विद्युत-यांत्रिक
  3. न्युटन चा गतीचा दुसरा नि.
  4. 344 मीटर/सेकंद
  5. सिंधुदुर्ग
  6. रामटेक
  7. नागपूर
  8. यापैकी नाही
  9. दर्पण
  10. लोकसभा
  11. डॉ.एस.राधाकृष्णन
  12. GDP (Gross Domestic Product)
error: Content is protected !!