General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 01

Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.

  1. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो?
    A) जीवनसत्त्व ‘ब’
    B) जीवनसत्त्व ‘क’
    C) जीवनसत्त्व ‘ड’
    D) जीवनसत्त्व ‘अ’

  2. कर्करोगाचे उपचार व निदान करणारे डॉक्टर?
    A) कार्डिओलॉजिस्ट
    B) न्यूरोलॉजिस्ट
    C) ऑन्कोलॉजिस्ट
    D) नेफ्रोलॉजिस्ट

  3. कृत्रिम रित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे बंदी असलेले द्रव्य कोणते?
    A) कॅल्शिअम कार्बाईड
    B) कॅल्शिअम क्लोराईड
    C) सोडियम क्लोराईड
    D) पोटॅशियम सल्फेट

  4. तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते?
    A) नायट्रोजन
    B) निकोटीन
    C) क्लोरिन
    D) हायड्रोजन

  5. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
    A) मुंबई
    B) दिल्ली
    C) पंतनगर
    D) पुणे

  6. जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
    A) छत्रपती संभाजीनगर
    B) नाशिक
    C) भंडारा
    D) ठाणे

  7. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
    A) मुंबई
    B) मुंबई उपनगर
    C) ठाणे
    D) पुणे

  8. भारतीय संसदेने कोणत्या साली हिंदू विवाह कायदा संमत केला?
    A) 1953
    B) 1954
    C) 1955
    D) 1956

  9. जून 1757 च्या कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला?
    A) प्लासी
    B) बक्सार
    C) पानिपत
    D) कालिकत

  10. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या कायद्याला काय म्हणतात?
    A) माँटेग्यू – चेम्सफोर्ड कायदा
    B) मोर्ले – मिंटो कायदा
    C) आयर्विन – विलिंग्डन कायदा
    D) माउंटबॅटन कायदा

  11. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
    A) धर्मनिरपेक्ष
    B) साम्राज्यवादी
    C) लोकशाही
    D) प्रजासत्ताक

  12. NITI आयोग म्हणजे ….. होय.
    A) National Institution for Transforming India
    B) National Institute for Transforming Industries
    C) National Institution for Trade India
    D) National Institution for Traditional India

उत्तरे –

  1. जीवनसत्त्व ‘अ’
  2. ऑन्कोलॉजिस्ट
  3. कॅल्शिअम कार्बाईड
  4. निकोटीन
  5. पुणे
  6. छत्रपती संभाजीनगर
  7. मुंबई उपनगर
  8. 1955
  9. प्लासी
  10. माँटेग्यू – चेम्सफोर्ड कायदा
  11. साम्राज्यवादी
  12. National Institution for Transforming India
error: Content is protected !!