General Studies Test - 11

सामान्यज्ञान सराव प्रश्नपत्रिका – 04

Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy

# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.

# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.

  1. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
    A) हाडांचा अभ्यास
    B) दातांचा अभ्यास
    C) चेतासंस्थेचा अभ्यास
    D) प्रसूती शास्त्राचा अभ्यास

  2. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
    A) न्यूटन
    B) डार्विन
    C) आइनस्टाईन
    D) गॅलिलिओ

  3. पितळ हे संमिश्र धातू कोणत्या धातूचे बनलेले आहे?
    A) तांबे व जस्त
    B) तांबे व कथिल
    C) तांबे,जस्त व कथिल
    D) लोह व तांबे

  4. चॅट-जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे?
    A) चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेनड ट्रान्सफॉर्मर
    B) चॅट जेनेरिक प्री फिक्स ट्रेनिंग
    C) चॅट जनरल प्री डिफाइन टूल
    D) यापैकी नाही

  5. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
    A) दारव्हा
    B) मोरेगांव
    C) महागांव
    D) घाटंजी

  6. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
    A) 935
    B) 931
    C) 946
    D) 952

  7. पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते?
    A) पुष्पवंती नगरी
    B) पुष्पधरा
    C) पुसनगरी
    D) पौषनगरी

  8. आधुनिक भारताचे जनक असा कोणत्या समाजसुधारकचा उल्लेख केला जातो?
    A) राजा राममोहन रॉय
    B) महात्मा फुले
    C) दादाभाई नौरोजी
    D) न्या.म.गो.रानडे

  9. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली?
    A) डायर कमिशन
    B) हंटर कमिशन
    C) रौलेट कमिशन
    D) ओडवायर कमिशन

  10. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे?
    A) हाताचा पंजा
    B) चरखा
    C) सिंहमुद्रा
    D) अशोकचक्र

  11. दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
    A) सीबीआय
    B) सीआयडी
    C) रॉ
    D) एनआयए

  12. भारतीय रिझर्व्ह बँक ची स्थापना कधी झाली?
    A) 15 ऑगस्ट 1947
    B) 1 एप्रिल 1935
    C) 26 जानेवारी 1950
    D) 1 एप्रिल 1949

उत्तरे –

  1. चेतासंस्थेचा अभ्यास
  2. आइनस्टाईन
  3. तांबे व जस्त
  4. चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेनड ट्रान्सफॉर्मर
  5. दारव्हा
  6. 952
  7. पुष्पवंती नगरी
  8. राजा राममोहन रॉय
  9. हंटर कमिशन
  10. हाताचा पंजा
  11. एनआयए
  12. 1 एप्रिल 1935
error: Content is protected !!