Last Updated on November 24, 2025 by Topcop Academy
# TopCop Academy द्वारे तयार करण्यात आलेली सामान्यज्ञान विषयाची सराव प्रश्नपत्रिका. उत्तरे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिली आहेत.
# TopCop Academy च्या YouTube चॅनेल ला अवश्य भेट द्या. लिंक पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे.
- संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-Commerce तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय?
A) e-mail
B) e-post
C) e-writing
D) e-banking - अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो?
A) नायट्रोजन
B) कार्बन डायऑक्साइड
C) ऑक्सीजन
D) अरगॉन - मानवी शरीरातील ॲपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो?
A) जठर
B) स्वादुपिंड
C) लहान आतडे
D) मोठे आतडे - विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे?
A) रोधांची एकसर जोडणी
B) रोधांची समांतर जोडणी
C) विभवांतराची एकसर जोडणी
D) विभवांतराची समांतर जोडणी - अजिंक्यतारा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) धुळे
B) पालघर
C) रायगड
D) सातारा - अडाण धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) बीड
B) वाशिम
C) नाशिक
D) बुलढाणा - राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A) अकोला
B) रायगड
C) कोल्हापूर
D) धाराशिव - सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन 1900 मध्ये कोणी प्रवेश घेतला?
A) लक्ष्मणशास्त्री जोशी
B) यशवंतराव चव्हाण
C) महात्मा फुले
D) डॉ.बाबासाहेब आंबेडकर - कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही?
A) दासबोध
B) मनाचे श्लोक
C) अपरोक्षानुभव
D) आनंदवन भवन - भारतीय गुन्हेगारी कायद्यांसंदर्भात पूर्वी अस्तित्वात असलेल्या I.E.A. चा लाँग फॉर्म काय आहे?
A) Indian Employment Act
B) Indian Energy Act
C) Indian Evidence Act
D) Indian Exchange Act - सातारा जिल्ह्यामध्ये SRPF चे किती ग्रुप सध्या स्थित आहेत?
A) 1
B) 2
C) 3
D) यापैकी नाही - जागतिक आर्थिक संघटनांची मुख्यालये दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?
A) जागतिक व्यापार संघटना (WTO) – जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
B) युरोपियन युनियन (EU) – ब्रुसेल्स (बेल्जियम)
C) ओपेक (OPEC) – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
D) आसियान (ASEAN) – काठमांडू (नेपाळ)
उत्तरे –
- कार्बन डायऑक्साइड
- मोठे आतडे
- रोधांची समांतर जोडणी
- सातारा
- वाशिम
- कोल्हापूर
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- अपरोक्षानुभव
- Indian Evidence Act
- यापैकी नाही
- आसियान (ASEAN) – काठमांडू (नेपाळ)
